Pune Crime: चित्रपटांचा परिणाम तरुणांवर पडत असतो,कलाकांराच्या स्टाईलपासून ते त्याचे कपडे सर्वंच गोष्टींचा परिणाम होत असतो. नुकताच शाहिद कपुरचा 'फर्जी' हा शो प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे, नकली नोटा कसा प्रचलित आल्या असा ड्रामा बघायला मिळतो. या चित्रपटाचा परिणाम पुण्यातील हिंजवडीतील दोन तरुणांवर पडला आहे. हिंजवडीतील दोन तरुणांनी असाच पराक्रम करत असल्याचं पोलिसांच्या कानी आले होते. पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा- बनावट जॉब ऑफर्स पासून सावध राहण्याचा Naukri.com चा इशारा)
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी जवळील माण येथील अभिषेक राजेंद्र काकडे (२०) आणि ओंकार रामकृष्ण टेकाम (१८) या दोघांना अटक करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरिक्षक राम गोमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने त्यांना माण गावाकडे जात असताना आयटी पार्क जवळी बोडकेवाडी फाट्यावर पकडले. दोन आरोपींसोबत एक अल्पवयीन मुलगा देखील होता. पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी या तिघांकडून १.२० लाख रुपयांच्या दर्शनी मूल्याचा बनावट नोटा जप्त केल्या. सर्व नोटा ५०० रुपयांचा होत्या. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्यांच्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना अटक केले. पोलिस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहे. सुरुवातीला घरी बनावट नोटा छापल्याचे संशय आले परंतु छापा टाकल्यानंतर समजले की गाडीत बनावट नोटा छापण्याचे काम करत होते. पोलिसांनी बनावट नोटा जप्त केल्यानंतर सर्व नोटांवर एकच नंबर असल्याचे आढळले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.