मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी तलाव ओव्हरफ्लो
Tulshi Talao (Photo Credits-Twitter)

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी तलाव (Tulsi Lake) ओव्हरफ्लो झाले आहे. तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलाव काठोकाठ भरले गेले आहे.

तुळशी तलावात पाणीसाठ्याची क्षमता 139.17 मीटर एवढी आहे. तर नुकताच या तलावात 137.10 मीटर एवढी पाण्याची पातळी गाठली आहे. तर याच तुळशी तलावामधून मुंबईकरांना पाण्यााचा पुरवठा केला जातो. तर मुंबईत या तलाावतून जवळजवळ 14,47,363 दशलक्ष लीटर पाणीसाठी पुरवला जातो.

(रायगड: टपालवाडी धबधब्यात पाय घसरुन पडल्याने पाण्यात बुडून तरुणीचा मृत्यू)

तर मुंबईत काही दिवस आणखी मुसळधार पाऊस झाल्यास जाणवणारी पाण्याची कमतरता कमी होऊ शकते. त्याचसोबत गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबईत 10 टक्के पाणी कपात करण्यात आले होते.