रायगड (Raigad) जिल्ह्यातील टपालवाडी धबधब्यात पाय घसरुन पडल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जात तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर आज सकाळी मृत पावलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
संजना शर्मा असे तरुणीचे नाव आहे. संजना ही कल्याण येथे राहत असून ती आपल्या काही मित्रमैत्रींसोबत धबधब्याच्या येथे फिरण्यासाठी आली होती. त्यावेळी धबधब्याच्या ठिकाणी गेली असता तिचा पाय घसरल्याने ती बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(काशिद समुद्रावर पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक बुडाले)
यापूर्वीसुद्धा रोहा मधील कुंडलिका नदीत पोहण्यासाठी आलेल्या तीन जण बुडून मृत्यू झाला. तर काशिद समुद्रावर पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र पोलिसांकडून धोक्याची ठिकाणी न जाण्याचे आवाहन करुनही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.