शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल आहे. आज सोमवारी पहाटे वाजून 7 मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते 100 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2021
बाबासाहेबांच्या निधानानंतर राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यानं कडून श्रद्धांजली अर्पण
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 15, 2021
इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत. pic.twitter.com/CAYAFXQziB
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) November 15, 2021
ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे ही अवघ्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. बाबासाहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली.
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 15, 2021
वंदनीय शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली !
महाराष्ट्राच्या कणाकणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग मराठीजनांच्या मनामानात चेतवणारे शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांची आज पहाटे ५:०७ वा. प्राणज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/1qb2buqZ0z
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 15, 2021
Shivshahir Babasaheb Purandare is critical and undergoing treatment at the Deenath Mangeshkar Hospital. Please refrain from sharing otherwise.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
— Siddharth Shirole (@SidShirole) November 14, 2021
वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
— nitesh rane (@NiteshNRane) November 15, 2021
शब्दयज्ञकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकुन अतिशय दुःख झाले.
छत्रपतींच्या इतिहासाचा संशोधनकार, साहित्यिक, अभ्यासक हरपला,
माझी भावपुर्ण श्रद्धांजली !!! pic.twitter.com/bczFdshaxa
— Prasad Lad (@PrasadLadInd) November 15, 2021
बाबासाहेबांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. बाबासाहेबांनी हयातभर शिवचरित्राचा ध्यास घेतला होता. शिवचरित्र सांगणं, ते लिहिणं आणि राजा शिवछत्रपतींचे विचार सगळ्यांपर्यत पोहचवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. या कामासाठी त्यांना राज्यातील जनतेनं मोठा प्रतिसाद दिला.