Mumbai Police | (Photo Credits: File Image)

मुंबई शहराला आता कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारी, प्रशासन, वाहतूक आणि आर्थिक गुन्हे यानंतर सहावा Joint Commissioner मिळणार आहे. या नव्या जॉईंट कमिशनर कडे sleeper cells चा मागोवा ठेवण्यासह गुप्तचर माहिती गोळा करण्याची जबाबदारी असणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. सध्याच्या भारत-पाकिस्तान तणावानंतर महाराष्ट्र राज्य सरकार कडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहिती गोळा करण्याचे काम विशेष शाखेकडून केले जात होते. ज्याचे नेतृत्व अतिरिक्त आयुक्त (उपमहानिरीक्षक दर्जाचे) करतात आणि ते संयुक्त आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांना अहवाल देतात. आता या नव्या शाखेचे नेतृत्व एक Joint Commissioner करतील, जो महानिरीक्षक दर्जाचा असेल असे केले आहे.

विशेष शाखा शहरातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवते, गुप्तचर माहिती गोळा करते तसेच स्लीपर सेल आणि दहशतवादाच्या हालचालींवर लक्ष ठेवते. नवीन यंत्रणेअंतर्गत, विशेष शाखेचे सहआयुक्त थेट आयुक्तांना अहवाल देतील आणि सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याशी समन्वय साधतील, असे सांगण्यात आले आहे.

गुप्तचर माहिती गोळा करण्यास आणि वरिष्ठांना वेळेवर माहिती देण्यास या नव्या पदामुळे मदत होईल जेणेकरून झटपट कारवाई करता येईल. सध्या, अतिरिक्त आयुक्त (विशेष शाखा) हे पद रिक्त आहे आणि ते अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या देखरेखीखाली आहे. नक्की वाचा: India-Pakistan Tensions: मुंबईत 11 मे ते 9 जूनदरम्यान फटाके वाजवण्यास बंदी; पोलिसांनी जारी केले आदेश .

मुंबई पोलिस आयुक्त पदी मे महिन्याच्या सुरूवातीलाच  देवेन भारती यांनी पदभार स्वीकारला आहे. विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांची आयुक्तपदी वर्णी लागली आहे.