कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशातील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सध्या संपूर्ण देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सचे पालन करणे अधिक गरजेचे आहे. यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पावर (Ajit Pawar) यांनीही मुस्लिम बांधवांना रमजान ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन केले आहे. रमजान हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात रोजे अर्थात उपवास करण्यासोबतच अनेक गोष्टींची बंधन स्वत:वर घालून घ्यायची असतात. त्यामुळे रमजानचा महिना मुस्लीम बांधवांसाठी खास असतो. त्यातच रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देतात.
भारतात यावर्षी 25 मे रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. रमजान ईद साजरी करताना लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने मुस्लिम बांधवाना केले आहे. सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडणे गरजेचे आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महत्वाचा संदेश दिला आहे. "ईद-उल-फित्र तथा 'रमजान ईद' आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज आपला 'कोरोना' विरुद्ध लढा सुरु आहे, तो आपण अजून जिंकला नसला तरी निर्णायक टप्प्यावर आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात", असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'रमजान ईद'च्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात एकूण 50 हजार 231 कोरोनाबाधित; राज्यात दिवसभरात 3 हजार 41 रुग्णांची नोंद तर, 58 जणांचा मृत्यू
ट्वीट-
ईद-उल-फित्र तथा 'रमजान ईद' आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज आपला 'कोरोना' विरुद्ध लढा सुरु आहे, तो आपण अजून जिंकला नसला तरी निर्णायक टप्प्यावर आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि pic.twitter.com/AUgW1Lxkti
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) May 24, 2020
भारतात यावर्षी उद्या म्हणजेच सोमवारी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. रमजान ईद साजरी करताना लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने मुस्लिम बांधवाना केले आहे.