Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आज 3 हजार 41 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 635 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 1 लाख 31 हजार 868 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 3 हजार 867 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 54 हजार 441 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्र: गेल्या 24 तासात पोलीस दलातील 87 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 1758 वर पोहचला

एएनआयचे ट्वीट-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.