Thane Water Cut : ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation)शुक्रवारी 24 तासांसाठी पाणी पुरवठा राहणार बंद (Thane Water Cut) राहणार असल्याची घोषणा केली आहे. महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्वाचा स्त्रोत असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कळवा, मुंब्रा, दिवा आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही. गुरुवार, 27 जुन रोजी रात्री 12 ते शुक्रवार, 28 जुन रोजी रात्री 12 या कालावधीत चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. (हेही वाचा:Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 5 टक्केच पाणीसाठा शिल्लक; पाणी जपून वापरण्याचे पालिकेकडून आवाहन)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता), कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणी पुरवठा बंद राहील.
पोस्ट पहा
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) June 25, 2024
त्याशिवाय या बंदमुळे त्यापुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. आधीच या भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या असून पाणी बंदमुळे ती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज 590 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून 120 दशलक्ष लीटर आणि मुंबई महापालिकेकडून 85दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.