Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणाची पाणीपातळी चांगलीच खालावली आहे. धरणांनी तळ गाठल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 5 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यात मान्सून दाखल झाला अला तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. आधीच मुंबईमध्ये 10 ते 15 टक्के पाणीकपात सुरू आहे. त्यात आता धरणातील पाणी पातळीच्या घसरत्या आकडेवारीने मुंबईवर पाणीकपाती शिवाय येत्या काळा पाणी पुरेल का अशी चिंता निर्माण झाली आहे. सध्या मुंबईला 2 धरणांतील राखीव कोट्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 5 टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.
पावसाचा लपंडाव सुरू असल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना पालिकेकडून आवाहन केले जात आहे. मुंबई महानगर पालिकेने 30 मे पासून 5 टक्के पाणीकपात केली होती. त्यानंतर 5 जूनपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्यात आली. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यासारख्या तलाव आणि धरणांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो.