TikTok Star Sameer Gaikwad Suicide: टिक टॉक स्टार समीर गायकवाड याचा मृत्यू, राहत्या घरात गळफास
TikTok Star Sameer Gaikwad | (Photo Credit: YouTube)

टिक टॉक स्टार (TikTok Star) समीर गायकवाड याचा मृत्यू झाला आहे. पुणे (Pune) येथील वाघोली परिसरात राहत्या घरी गळफास घेतलेल्या आवस्थेत समीर गायकवाड (Sameer Gaikwad) याचा मृतदेह आढळून आला. रविवारी सायंकाळी 5 वाजणेच्या सुमारास ही घटना पुढे आली. समीर (वय २२, रा. निकासा सोसायटी, केसनंद रोड, वाघोली) याने आत्महत्या(TikTok Star Suicide) केली असावी असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक माहिती देताना व्यक्त केला. समीर याने आत्महत्या (TikTok Star Sameer Gaikwad Suicide) केल्याचा अंदाज असला तरी अद्याप कोणत्याही प्रकारची सुसाईन नोट पुढे आली नाही.

समीर गायकवाड याची आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली असावी असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कोणतेही ठोस कारण अद्याप पुढे आले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर याने आत्महत्या करण्यापूर्वी खोली आतून बंद केली होती. त्यानंतर त्याने साडीचा फास बनवला आणि छताच्या पंख्याच्या सहाय्याने आत्महत्या केली. समीर याने आत्महत्या केल्याची बाब प्रथम त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याच्या निदर्शनास आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आले की, गेल्या काही काळापासून समीर हा अस्वस्थ होता. त्याच्या प्रेमसंबंधामध्येही गेल्या काही काळापासून दूरावा आला होता.

प्रफुल्ल गायकवाड (समीरचा चुलत भाऊ) याने सांगितले की, मी जेव्हा त्याच्या खोलीत गेलो तेव्हा त्याचे शरीर पंख्याला लटकताना पाहिले. मी तातडीने पोलिसांना माहिती दिली. समीर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. समीर गेल्या प्रदीर्घ काळापासून आपले टिकटॉक व्हिडिओ आणि इतर काही छोट्या व्हिडिओंच्या माध्यमातून जोरदार प्रसिद्धित होता.तो पुणे येथील वाडिया कॉलेज येथून शिक्षण पूर्ण करत होता. (हेही वाचा, Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण; 'त्या' ऑडिओ क्लिपनंतर भाजप आक्रमक)

पुणे पोलीस समीर याच्या मृ्त्यूचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. अद्याप तरी समीर याच्या मृत्यूबाबात कोणतीही सुसाईड नोट पुढे आली नाही. तसेच त्याच्या शरीरावर मारहाण अथवा कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीच्या खुणा आढळून आल्या नाहीत. दरम्यान, समीर याच्या आठवणीत त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर त्याचे व्हिडिओ अपलोड करणे सुरु केले आहे.