![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/monsoon-india-rain-pti-784x441-1-1-380x214.jpg)
Maharashtra Weather Update: हवामान विभागाकडून 10 मे पर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli), बीड (Beed), हिंगोली (Hingoli), परभणी (Parbhani), अहमदनगर (Ahemadnagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गडगडाटी विजांसह, गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासाठी येत्या 5 दिवसांसाठी डगडाटासह मुसळधार पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मोठ्या झाडांच्या जवळ वा आडोशाला उभे राहू नका असेही सांगण्यात आले आहे. वीज चमकत असताना उघड्या ठिकाणी उभे राहू नका.हेदेखील वाचा- Maharashtra Weather Update: राज्यात दुपारी ऊनाचा कडाका तर संध्याकाळी पावसाचा तडाखा; 10 मे पर्यंत चालणार ऊन-पावसाचा खेळ
Thunderstorms with lightning, gusty winds & moderate to intense spells of rain very likely at isolated places in the districts of Pune, Ahmednagar, Satara,Sangli,Hingoli, Beed, Parbhani and Osmanabad during next 3-4 hrs. pic.twitter.com/D1orkBuO8Y
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 8, 2021
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी 6 ते 11 मे दरम्यान वादळी वारे आणि गारपिटीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर कर्जत-जामखेडमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची आणि जनावरांची काळजी घ्यावी.