Mumbai local Train Murder case PC TWITTER

Local Train Murder Case: गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या अनेक विचित्र घटना समोर येत आहे. यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. भरधाव रेल्वेत एका 55 वर्षीय प्रवाशावर चार जणांनी बेल्टने आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना टिटवाळा आणि वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. या घटनेनंतर रेल्वेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दारूच्या नशेत हल्लेखोरांनी पीडितेला बेल्टने आणि चाकूने मारहाण केली. ही घटना २८ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळीस घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील साजिवली गावातील शेतकरी दत्तात्रय भोईर यांची भरधाव रेल्वेत हत्या करण्यात आली आहे. रेल्वेत हत्याच्या वेळी एका प्रवाशाने हा व्हिडिओ गुपचूप आपल्या फोनमध्ये कैद केला. हल्ल्याचा संपुर्ण व्हिडिओ फोनमध्ये कैद झाला आहे. (हेही वाचा-दिल्ली मेट्रोमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराच, एक्सवर शेअर केला अनुभव)

तीन ते चार आरोपी बेल्टने प्रवाशाला मारहाण करत आहे त्यानंतर त्यांना एकाने चाकूने मारहाण केली. त्यांच्या पोटावर चाकूने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतर ट्रेन थांबल्यानंतर जखमीला वाशिंद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाशिंद रेल्वे स्थानकावरून आरोपी फरार होणारचं होते परंतु तेवढ्यात  रेल्वे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. भोईर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना क्रिस्टल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कुठल्यातरी क्षुल्लक कारणावरून भोईर आणि हल्लेखोरांंमध्ये वाद झाला होता. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले आणि यात एकाने चाकूने हल्ला केला. रेल्वे पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींवर 302, 324, 337 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीवर यापूर्वीही प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल होता.