
आज भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याला साजरं करणारा खास दिवस, तो म्हणजे भाऊबीज. दिवाळीच्या सणात या दिवसाला खूप महत्त्व आहे कारण याच दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याचे औक्षण करते आणि भाऊ आपल्या बहिणीला एक भेटवस्तू देतो.
या खास दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नावाजलेल्या कुटुंबानेसुद्धा एकत्र येऊन हा सण साजरा करत या दिवसाची गोडी अधिक वाढवली. हे कुटुंब म्हणेज पवार कुटुंब.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या बहिणींनी औक्षण केले. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्याची बहीण खासदार सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या पाठोपाठ अजून एक पिढीनेसुद्धा राजकारणात नुकतीच एंट्री केली आहे आणि ते म्हणजे तरुण आणि नवनिर्वाचित आमदार रोहित पवार. रोहित यांनाही त्यांच्या बहिणींनी औक्षण करून भाऊबीज साजरी केली.
पवार कुटुंबीयांचा हा एकत्रित जमून साजरी केलेला आनंदमय सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.