Shrikant Shinde | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळात आता मुलांनीही प्रवेश केला आहे.  एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सूत्रे हाती घेतली आहेत, तर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीही या लढ्यात वडिलांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत या धमक्या दुसऱ्या कुणाला तरी द्याव्यात, इथे या धमक्यांचा काहीही परिणाम होणार नाही, असे म्हटले आहे. आम्ही धमक्यांना घाबरत नाही. येत्या काळात राज्यातील जनता संजय राऊत यांना उत्तर देईल. तसेच सरकार अल्पमतात आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची असून आमचा लढा आता कोर्टात पोहोचला असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

हिंदुत्व आणि बंडखोरीच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असून एकनाथ शिंदे यांनी नेहमीच राज्याच्या हितासाठी काम केले असून बंड करूनही त्यांनी पुन्हा एकदा राज्यहितासाठी काम केले आहे. यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत आहे. शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या एकाही आमदाराने शिवसेना सोडल्याचे सांगितले नाही.  सर्व शिवसैनिक आहेत. हेही वाचा Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाला 11 जुलै पर्यंत स्थगिती पण बहुमत चाचणी बाबत पहा काय म्हणतंय सर्वोच्च न्यायालय

संजय राऊत यांनी विचारपूर्वक बोलावे. महाराष्ट्रातील जनता सर्व काही पाहत आहे.  माणसाच्या पायाखालची वाळू सरकू लागली की अशी विधाने केली जातात. याचे उत्तर आगामी काळात जनतेला मिळेल. राऊत यांच्या तोंडून निघालेल्या कोणत्याही गोष्टीला उत्तर देण्यात मला रस नाही. संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले तर त्यांना शुभेच्छा. दोन दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.

उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या समर्थकांनी ही तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला. काही लोक श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयावर दगडफेक करताना दिसले आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करताना दिसले.  एका पत्रकाराने हा व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये चार पोलिस आठ ते दहा लोकांचा समावेश असलेल्या जमावाचा पाठलाग करताना दिसत आहेत.