नरहरी झिरवळ (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असल्याने काही दिग्गज मंडळींना पराभव पत्करावा लागला आहे तर काही नवख्या चेहऱ्यांनी विजयाकडे कूच केली आहे. या सर्वात एक वेगळा नाव ठरलं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवळ.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवळ यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तब्बल 60 हजार 813 च्या मताधिक्याने झिरवळ यंदा निवडून आले आहेत. तर या मतदारसंघातून शिवसेनेचे भास्कर गावित यांचा पराभव झाला आहे. पण झिरवळ निवडून आल्याबद्दल नाही तर काही जुन्या आठवणींमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत दिसत आहेत.

त्यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या फोटोमध्ये झिरवळ हे शेतात नांगर धरताना दिसत आहेत.

ऐन निवडणूक काळात काँग्रेस- राष्ट्रवादी सोडून भाजप- शिवसेनेत प्रवेश केलेल्या 'या' 9 उमेदवारांचा झाला पराभव

2014 साली झालेल्या निवडणुकीत झिरवळ यांनी 12 हजार 633 मतांनी विजय मिळवला होता तर 2019 साली त्यांनी जवळपास 60 हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. यंदाच्या भव्यदिव्य विजयानंतर झिरवळ यांचा हा मागील वर्षीचा फोटो व्हायरल झाला आहे. वनारे येथे त्यांच्या नावावर 30 एकर जमीन असल्याचे झिरवळ यांनी उमेदवारी अर्जबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर शेतीबरोबर ते पशूपालनाचा जोडधंदाही करतात.