CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Resigned) देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे मला कोणतेही दु:ख नाही, असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी एमएलसी सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या (BJP) गोटात जल्लोषाचे वातावरण होते.  देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना मिठाई खाऊ घालून शुभेच्छा दिल्या. मात्र आता या सर्व घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता गुरूवारी बहुमताची चाचणी होणार नाही. हेही वाचा  Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत

याउलट मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकासआघाडी सरकार पडलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भाजपकडे बहुमताची विचारणा करतील. भाजपकडे बहुमत असेल तर ते त्याचं पत्र राज्यपालांना देतील. राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावतील. शपथविधीमध्ये मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या मंत्र्यांचा शपथविधी होईल. शपथविधीनंतर भाजपला विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करावे लागेल.