सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जारदोर निशाणा (Ajit Pawar On Wine Decision) साधत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. 'वाईन (Wine ) आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक सरकारला बदनाम करत आहेत. उगाचच मद्यराष्ट्र वैगेरे म्हणत आणि व्हिडिओ क्लिप काढत सरकारला बदनाम करत आहेत. अनेक राष्ट्रांमध्ये पाण्याऐवजी वाईनच वापरली जाते. हे आपणा सर्वांनाच माहिती आहे, असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आणि राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.

पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यात घेतल्या जाणाऱ्या विविध फळांपासून वाईन निर्मिती होते. प्रामुख्याने द्राक्षे, काजू आदी फळांपासून वाईन निर्मिती होते. राज्यात जेवढ्या प्रमाणात वाईन निर्मिती केली जाते तेवढ्या प्रमाणात ती खपत नाही. ती इतर राज्ये आणि विदेशात निर्यात करावी लागते. पण उगाच काही लोग मद्य राष्ट्र वैगेरे म्हणून इतर गोष्टींना महत्त्व देत आहेत, असे अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, Schools & Colleges Reopen in Pune: पंधरा ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळेतच लसीकरण, पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु- अजित पवार)

आम्ही सरकारमध्ये काम करत असताना जनतेच्या हिताचेच निर्णय घेऊ. जनतेचे नुकसान होईल असे काही करणार नाही. निर्णय घेणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. इतर अनेक राज्यांनी घरपोच दारु पोहोचविण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यांचा निर्णय त्यांना लखलभ पण आपण घेतलेल्या निर्णयात दारु विक्रिसाठी परवानगी नाही. केवळ वाईन विक्रिसाठी परवानगी देण्यात आली आहे, असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना संपादकीयामध्येही राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करण्यात आले असून, “राज्यातील भाजपा देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागला आहे”, अशी खोचक टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षालाच वाईन चढल्याचा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.