Pune Crime: अक्षय्य तृतीया निमित्त ग्राहकांनी सोन्याच्या दुकानात गर्दी केली. यात पुण्यातील सोन्याच्या दुकानातून सहा चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बड्या चालाकीने सराफाच्या दुकानातून मालकाची नजर चुकवत काही मिनिंटात 25 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. ही चोरीची घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना पुण्यातील येरवाडा येथील आहे. (हेही वाचा- पुणे येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेज कॅम्पसमध्ये राडा)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा बाजार येथील महावीर ज्वेलर्समध्ये ही चोरीची घटना घडली. चांदीची मुर्ती घेण्याच्या बहाणे आलेल्या सहा चोरट्यांनी खेळ खंडोबा रचत ही चोरी केली. या प्रकरणी दुकानाचा मालक राकेश गोपीलाल जैन यांनी पोलिस ठाण्यात फीर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. पुणे पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे.
— bharat jadhav (@bharatjadhav891) May 9, 2024
दुकान मालकांने पोलिसांना सांगितले की, बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुकानात सहा जण आले. दोघांन्ही लहान मुलीसाठी अंगठी बघायची सांगितले. तर दोन जण चांदीची मुर्ती घेण्याच्या बहाणे आले. त्यांनी अंगठी बगितली परंतु न घेता परतले. त्यानंतर दुसऱ्यांनी चांदीची मुर्ती पाहिजे असं सांगत त्यांना शोकेसमधील मुर्ती काढण्यासाठी सांगितले.
दुकान मालक काउंटरवरून उठून शोकेशमधील मुर्ती दाखवण्यासाठी पुढे गेले. तेवढ्यात मागे दोघांन्ही ड्रावरमधील ठेवलेले सोन्याचे दागिने घेतले. त्यात मंगळसुत्र, वाट्या, मणी, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चैन असं करत तब्बल ३७२ ग्रॅम चोरलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु आहे.