पुणे येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात कथीतरित्या झालेल्या वादाचे पर्यावसन कोयता हल्ल्यात झाले. कॉलेज कॅम्पसमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे मीररने तो आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये काही तरुण परस्परांवर कोयता घेऊन धावत असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, घडल्या प्रकाराबद्दल दोन्ही गटांनी दिघी पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रार दिल्याचे समजते. दरम्यान, घडल्या प्रकारानंतर कॉलेज परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा, Pune Crime: कॉलेज होस्टेलमध्ये रुममेटचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ बॉयफ्रेंडला पाठवणाऱ्या विद्यार्थिनीवर कारवाई)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)