Photo Credit- X

Kaali Peeli Taxis: मुंबईत वाढत्या यांत्रिकीकरणाच्या स्पर्धेत अनेक मोठे बद होत आहे. काही उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. अनेकांच्या हातच्या नोकऱ्या जात आहेत. तर आता त्यातच मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सींची (Kaali Peeli Taxi) संख्या गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. 20,000 वरून संख्या 13,000 वर घसरली आहे, अशी माहिती मुंबई टॅक्सीमन्स असोसिएशने दिली आहे. (हेही वाचा:Kurla BEST Bus Accident: कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)

असे होण्यामागे अनेक कारणे समोर आली आहेत. मुख्य कारण चालकांकडून परवाने नूतनीकरण न करणे. त्यानंतर ओला/उबर सारखे स्पर्धात्मक असणे, खासगी वाहन खरेदी अशा अनेक गोष्टी आहेत. असोसिएशनच्या मते, काही चालक पर्यटक परवाने घेऊन ओला/उबेरसारख्या अॅप आधारित सेवांमध्ये सहभागी होण्याचा किंवा खासगी प्रवासी वाहतूक व्यवसायाकडे वळण्याचा पर्याय निवडत आहेत. त्याशिवाय, अनेक चालकांनी कुटुंबांतील तरुण पिढी या व्यवसायात येण्यास तयार नसल्याचे स्पष्ट केले.

मात्र, मुंबईकरांमध्ये काळ्या-पिवळ्या टॅक्सींविषयी भावनिक संबंध अजूनही कायम आहे. जुणी पिढी ओला/उबेरसारख्या सेवांना बगल देऊन टॅक्सीलाच पसंती देत आहेत. सध्या टॅक्सींसाठी स्टँडची संख्या घटली आहे. त्यामुळे काही जण मिळेल त्याठिकाणी टॅक्सी लावतात. त्यामुळे दंड लागू होतो. एका वेळी 500 रुपये आणि दुसऱ्यांदा 1,500 रुपये दंड भरावा लागतो. जो त्यांच्या दिवसाच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे.

असोसिएशनच्या मते जुनी आणि मोडकळीस आलेली वाहने विकण्यासही संघर्ष होत आहे. नव्या आणि महागड्या टॅक्सीसाठी कर्ज मिळवण्यात अडचणी येतात. काही जाणकारांच्या मते, काळ्या-पिवळ्या टॅक्सीची संख्या येत्या काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पूर्वी व्यावसायिक भागांतील स्टँडवर 20-30 टॅक्सीज दिसायच्या, आता तिथे फक्त 5-10 टॅक्सी उभ्या दिसतात.