गेली अनेक वर्षे कोपरी पुलावर (Kopri Bridge) होणारी वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. मात्र हा प्रश्न आता लवकरच सुटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई (Mumbai) आणि ठाण्याच्या (Thane) वेशी दरम्यान असलेल्या कोपरी उड्डाण पुलाच्या नव्या मार्गिकेचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे रखडलेले हे काम पुन्हा जोमाने सुरु झाले असून येत्या 15 जूनपर्यंत हे काम पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे.
या पुलाच्या पहिल्या टप्प्याचे हे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. र्व द्रुतगती महामार्गावर असलेल्या कोपरी उड्डाण पुलावर बॉटल नेक तयार होत असल्याने दिवस-रात्र प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. त्यात 22 जून 2017 ला रेल्वे वरील ब्रिज आय आय टी च्या सर्वेक्षणात हा पूल धोकादायक निष्पन्न झाल्याने या पुलाचे तातडीने पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता होती. अखेर 21 मे 2018 ला या पुलाच्या पुनर्निर्माण याच्या कार्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र त्यानंतर आलेल्या लॉकडाऊनमुळे हे काम रखडले.हेदेखील वाचा- Covid-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना मिळणार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
अखेर 2021 ला कामाने पुन्हा जोर पकडला त्यामुळे 15 जून पर्यंत काम पूर्ण होईल", असे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.
येत्या दहा ते पंधरा दिवसात उर्वरित काम पूर्ण होऊन हा पूल जून महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी शक्यता सांगितले जात आहे. मात्र अजूनही या फुलाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 1958 साली बांधलेला जुना कोपरी पूल पाडून त्या जागी नवीन पूल निर्माण करण्यात येईल. मात्र त्याचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. असे असले तरी अधिकच्या चार लेन उपलब्ध झाल्याने या पावसाळ्यात कोपरी पुलावर वाहतूक कोंडी होणार नाही. यामुळे एक प्रकारे मुंबई आणि ठाणेकरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.