ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ही कर्जमाफी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत केली जाणार आहे. पंरतु, कर्जमाफीच्या घोषणेनंतर विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे सातबारा कोरा करण्याच्या आश्वसानाची पूर्तता होत नाही. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पंरतु, या घोषणेमुळे कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण होत नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Farmer Leaders Raju Shetty) यांनी म्हटलं आहे.
ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबरपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, मागील वर्षभरात विशेषता दुष्काळ व त्यांनतर अतिवृष्टी, महापूर आदी कारणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या कर्जमाफीचा नेमका फायदा कोणाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे, असंही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेतकर्यांसाठी कर्जमाफीची घोषणा; 'महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत 2 लाखांपर्यंत मिळणार फायदा)
त्या पिकांना नुकसान भरपाईही नाही आणि कर्जाची मुदत जून २०२० पर्यंत असल्यामुळे ते थकीत नाहीत म्हणून त्यांच्या पदरात काहीच पडणार नाही.@ANI @uddhavthackeray @PawarSpeaks @INCMaharashtra
— Raju Shetti (@rajushetti) December 21, 2019
मागच्या वर्षी दुष्काळामुळे थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल. परंतु, महापूर, अतिवृष्टी यामुळे जे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या पिकांना नुकसान भरपाईही नाही आणि कर्जाची मुदत जून 2020 पर्यंत असल्यामुळे ते थकीत नाहीत. म्हणून त्यांच्या पदरात काहीच पडणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.