मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Photo Credits-ANI)

नागपूरातील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला विदर्भाच्या विकास कामांच्या मुद्द्यांवरुन भाष्य केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत परेदशांना देऊ करण्यात येणारी मदत ही महाराष्ट्राला सुद्धा करावी अशी अपेक्षा केली आहे. एवढेच नाही तर मोदी हे भाजपचे नाही तर देशाचे पंतप्रधान असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

अधिवेशनाच्या कामकाजाबाबत बोलत असताना त्यांनी ग्रामीण विभागातील नागरिकांच्या समस्यांच्या मुद्द्यावरुन भाषण केले. त्यात त्यांनी असे म्हटले की, ग्रामीण विभागातील नागरिकांना त्यांच्या समस्या घेऊन मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालयात यावे लागते. मात्र यापुढे आता नवे सरकार ग्रामीण विभागात CMO ऑफिस सुरु करणार असल्याने त्यांना मदत मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला धान उत्पादना तर्फे शेतकऱ्याला अधिक 200 रुपये मिळणार आहेत. त्याचसोबत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजन अंतर्गत शेतकऱ्याला मदत आणि शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. ही योजना मार्चपासून सुरुवात करण्यात येण्यापूर्वी  30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र राजू शेट्टी यांनी 7/12 कोरा असावा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी केली आहे.(Nagpur Winter Session: कॅगच्या अहवालावर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण; अकाउंटिंग दोषामुळे गोंधळ झाल्याची माहिती)

ANI Tweet:

एवढेच नव्हे तर विदर्भात खनिजसंपत्ती अधिक असल्याने त्याच्या समृद्धीसाठी वापर करण्यासाठी पूर्व विदर्भात मोठा स्टील प्लान्ट उभारणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली आहे. तसेच सिंचन प्रकल्पाला कोणतीही स्थगिती देणार नाही उलट कामे कशी लवकरात लवकर करण्यात येतील याकडे लक्ष देण्यात येणार आहे. टप्प्याटप्याने प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाणार आहेत. सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती करणार गोसेखुर्द प्रकल्पासाठी पुरेशा पैशांची सोय केली जाणार असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत समृद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन ही देण्यात आले आहे.