Gadchiroli Rain Update: गडचिरोलीतील (Gadchiroli) पर्लकोटा नदीच्या (Pearlkota River) पुराचे पाणी दुसऱ्यांदा भामरागड गावात शिरले आहे. त्यामुळे गावातील सुमारे 200 घरे पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील 9 हून अधिक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. पुराच्या पाण्याने शहरात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेले आहेत. (हेही वाचा - Maharashtra Monsoon Updates 2020: मुंबई, पालघर आणि रत्नागिरीसह 'या' भागात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता-IMD)
#गडचिरोलीतील पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी दुसऱ्यांदा #भामरागड गावात शिरले असून,गावातील सुमारे २०० घरे पाण्याखाली गेली आहेत.जिल्ह्यातील ९ हून अधिक मार्ग बंद झाले आहेत.त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.तरी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. @InfoGadchiroli pic.twitter.com/vwNmTok0ab
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 21, 2020
प्रशासनाकडून संपूर्ण शहराला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भामरागडमध्ये पोलीस व महसूल प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली आहे. पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम रेस्क्यू बोटच्या सहाय्याने सुरू आहे.