Mumbai Rain | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईसह उपनगरात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे आता पुढचे 24 तास सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता आयएमडी यांच्याकडून देण्यात आली आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथे पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार असल्याचे ही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुसळधार पावसासह वेगाने वारे सुद्धा वाहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील विदर्भातील क्षेत्रासाठी पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.(दिलासादायक! मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव अखेर ओसंडून वाहू लागले; मुंबई महानगरपालिकेने दिली माहिती)

IMD चे डायरेक्टर जनरल केएस होसाळीकर यांनी पावसाबद्दल अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, गेल्या 24 तासात मुंबई आणि ठाणे येथे 120MM पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्यानुसार, रायगढ ते माथेरान पर्यंतच्या परिसरात 122 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचसोबत अलिबाग येथे गेल्या 24 तासात 49 मिमी आणि रत्नागिरी आणि कोकण कोस्टलच्या ठिकाणी 83 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.(Maharashtra Monsoon 2020 Updates: मुंबई, ठाणे, कोकणात पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहणार- IMD)

दरम्यान, 24 ऑगस्ट पर्यंत पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर रायगढ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर हवामान विभागाच्या मते, 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत LPA तुलनेत 42 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. या आठवड्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर 13 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट दरम्यान 60.2 मिमी पाऊस झाला आहे.