Maharashtra Monsoon 2020 Updates: मुंबई, ठाणे, कोकणात पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहणार- IMD
Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबईत (Navi Mumbai) गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. या शहरांमधील काही ठिकाणी 120mm पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान मुंबई, ठाणे आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याचबरोबर पुढील 24 तासांत अंतर्गत भागातही पाऊस सुरुच राहील. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

काल रात्री पासूनच मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आजची सकाळी देखील दमदार पावसाने झाली आहे. पावसाचा जोर पुढील 24 तास तरी कायम राहणार आहे. तर राज्यात 22 ऑगस्टपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरुच राहणार आहे. (मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव अखेर ओसंडून वाहू लागले; मुंबई महानगरपालिकेने दिली माहिती)

K S Hosalikar Tweet:

दरम्यान जुलैमध्ये मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने या शहरांना झोडपून काढलं. त्यानंतर काही दिवस दडी मारुन बसलेला पाऊस 10-11 ऑगस्ट दरम्यान पुन्हा सक्रिय झाला. कमी-अधिक प्रमाणात बसरसत असलेल्या पावसाने काल पासून दमदार बॅटिंगला सुरुवात केली.