Mann Ki Baat 100 Episodes: 'मन की बात'च्या 100 वा भागानिमित्त मुंबईतील 22 हून अधिक मदरशांमध्ये  करण्यात येणार स्क्रीनिंग
Mann Ki Baat | (Photo Credits: narendramodi.in)

Mann Ki Baat 100 Episodes: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाचा 100 वा भाग या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचा हा भाग मुंबईतील (Mumbai) मदरशांतील मुलांना ऐकवण्यात येणार आहे. ज्याची तयारीही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मदरशांना साधारणपणे रमजानमध्ये सुट्टी असते, पण मन की बात ऐकण्याची तयारी कशी करायची? मुलांना काय ऐकायला मिळणार? यासंदर्भात पालकांना माहिती देण्यासाठी आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबईतील मरोळ येथे फैजान ए गरीब नवाज़ मदरसा आहे, जिथे 30 ते 35 मुले प्रशिक्षण घेतात. तिथे आज मुले आणि त्यांचे वडील इमामकडून माहिती घेण्यासाठी आले होते. त्यांना मन की बातमध्ये उपस्थित राहायचे आहे. मदरशातील सर्व मुलांनी सांगितले की, ते मन की बातच्या 100 वा भाग ऐकण्यासाठी खूप उत्सूक आहेत. त्यांना पंतप्रधानांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी यापूर्वी कधीही मन की बात ऐकली नाही. (हेही वाचा -  Dharohar Bharat Ki: दूरदर्शन वरील ‘धरोहर भारत की’ हा माहितीपट पाहण्याचे PM Narendra Modi यांचे नागरिकांना आवाहन)

मदरशामधील काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांनी त्यांच्या अभ्यासाविषयी बोलावे, अशी इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान नेहमीच देशाबद्दल बोलत असल्याने त्यांना प्रेरणा मिळते, असंही एका विद्यार्थ्याने सांगितलं. दरम्यान, मुलांच्या पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत पंतप्रधानांनी एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात संगणक दिल्याचे सांगितले. पूर्वी आमची मुलं परदेशात जाऊन इंग्रजी बोलणाऱ्यांकडे बघायची, पण पंतप्रधानांच्या शैक्षणिक धोरणामुळे ते स्वत: नव्या शर्यतीत सामील झाले आहेत.

दरम्यान, भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे सर्व कार्यकर्ते आणि नेते मदरशाशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्याचे काम करत आहेत. मन की बात क्रार्यक्रमांचा 100 वा भाग अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मदरशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्क्रीन लावण्यात येणार आहेत.