कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट कायम असले तरी अनलॉकिंगला सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात अनलॉकिंगचा पाचवा टप्पा सुरु आहे. अनलॉक 5 (Unlock 5) मध्ये हॉटेल्स, बार्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑक्टोबर 5 पासून राज्यातील हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट काही विशिष्ट अटींच्या आधारावर सुरु करण्यात आले आहेत. मात्र आता त्यांची वेळ वाढवण्याची परवानगी मिळाली आहे. उद्या, 10 ऑक्टोबरपासून ठाण्यातील हॉटेल्स, रेस्टॊरन्ट सकाळी 7 ते रात्री 11.30 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) ट्विटरवरुन दिली आहे.
अनलॉक 5 अंतर्गत सिनेमागृह, स्विमिंग पूल, एन्टरटेन्मेंट पार्क, ऑडिटोरियम आणि अन्य हॉल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. तसंच हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार्स सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली होती. मात्र आता ही वेळ वाढण्यात आली आहे. मात्र ग्राहकांची 50% मर्यादा कायम राहणार आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल मालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, हॉटस्पॉट क्षेत्रात यापूर्वी लागू केलेले निर्बंध कायम असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Unlock 5: महाराष्ट्रात आजपासून ग्राहकांसाठी खुली झाली हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि बार; जाण्यापूर्वी सरकारच्या 'ह्या' महत्वाच्या नियमांची करा उजळणी)
TMC Tweet:
#TMCUpdate: लॉकडाऊन कालावधीत हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॊरन्ट आणि बार सकाळी ०७.०० ते रात्री ११.३० या वेळेत सुरु ठेवणेस परवानगी देणेबाबत#Unlock5 #MissionBeginAgain #COVID19 pic.twitter.com/2icerEp6VF
— DigiThane (@DigiThane) October 9, 2020
कोविड-19 लॉकडाऊनमुळे गेल्या 6-7 महिन्यांपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद आहेत. या काळात केवळ होम डिलिव्हरीची सुविधा सुरु होती. त्यामुळे या निर्णयामुळे ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, ठाण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 19,9925 वर पोहचला असून त्यापैकी 16,2641 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर 32,161 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, एकूण 5,122 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.