ठाणे वाहतूक विभागाकडून Facebook, Instagram वर पेज सुरु, नागरिकांच्या विविध समस्यांचे होणार निवारण
Image For Representation (Photo Credits-Facebook)

सध्या सोशल मीडियाचा वापर ऐवढा वाढला आहे की, एखादा हरवलेला व्यक्ती सुद्धा एका साध्या व्हिडिओतून खुप वर्षांनी परतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच सोशल मीडियाचा वापर करुन नागरिक आपल्या समस्या खुल्या पद्धतीने तेथे व्यक्त करत त्या लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात. अशातच आता ठाणे वाहतूक विभागाने  (Thane Traffic Department) सुद्धा नागरिकांच्या मदतीसाठी फेसबुक (Facebook), इन्स्टाग्रामवर (Instagram) पेज सुरु केले आहे. या पेजवर वाहतूक विभागाकडून रस्त्ये मार्गातील बदल, रस्त्यांवर सुरु असलेली कामे आणि नागरिकांच्या तक्रारी अशा गोष्टींबद्दल नागरिकांना मदत केली जाणार आहे.(ऑनलाईन पद्धतीने Shopiiee.com वेबसाइटवरुन खरेदी करत असाल तर सावधान, तब्बल 22 हजार महिलांची फसवणूक झाल्याची बाब उघडकीस)

ठाणे वाहतूक शाखेने आता इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एन्ट्री केली आहे. तर लोक अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात. त्यानुसार लोकांच्या तक्रारी किंवा त्यांचे निवारण करण्यासाठी त्यांना याचा उपयोग होणार आहे. तसेच जर एखाद्या मार्गात बदल किंवा तो बंद असल्यास त्या संदर्भातील व्हिडिओ अथवा मेसेज या पेजवर पोस्ट केला जाईल. जेणेकरुन तो अधिक लोकांपर्यंत पोहचला जाईल असे वाहतूक विभागाच्या उपायुक्तांनी म्हटले आहे.(Thane: नागरिकांची ऑनलाईन खरेदीबाबत फसवणूक होऊ नये म्हणून पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर)

सध्या हे दोनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाहतूक शाखेकडून सुरु करण्यात आले आहेत. पण ट्विटरवर अद्याप सुरु केलेले नाही. मात्र मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अॅक्टिव्ह असल्याने या दोन प्लॅटफॉर्मवर अधिक लक्ष दिले जात आहे.