ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही व्यवहार करत असाल तर सावधान. कारण काही भामट्यांकडून नागरिकांची फसणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याच दरम्यान, आता ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Shopiiee.com वेबसाइटवरुन खरेदी करत असाल तर सावधान. कारण या वेबसाइटवरुन खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Shopiiee.com या वेबसाइटवरुन महिलांचे ड्रेस, ज्वेलरी सह अन्य काही वस्तूंची सुद्धा विक्री केली जाते. पण त्यासाठी सोशल मीडियात जाहिरात करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता काही माहिती समोर आली. त्यानुसार सायबर पथकाने गुजरात येथून हा प्रकार सुरु असल्याचे सांगण्यात आले. या मध्ये सुरत येथील 32 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली गेली आहे.(Thane: नागरिकांची ऑनलाईन खरेदीबाबत फसवणूक होऊ नये म्हणून पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर)
दरम्यान, पोलिसांसह बँकेकडून सुद्धा नागरिकांनी तुमची खासगी माहिती कोणालाच शेअर करु नका असे आवाहन केले जाते. तसेच ऑनलाईन पद्धतीने एखादा व्यवहार करताना तो कितपत सुरक्षित आहे याचा सुद्धा विचार करा. कारण फसवणूक करणाऱ्या व्यक्ती लोकांना सूट, ऑफरच्या नावाखाली बँकेची माहिती घेत तुमच्या खात्यातील रक्कम खाली करु शकतात. त्यामुळे नेहमीच आपली फसवणूक होणार नाही याची खात्री करुनच ऑनलाईन पद्धतीने व्यवहार किंवा खरेदी करावी असे वेळोवेळी आवाहन केले जाते.