Thane: नागरिकांची ऑनलाईन खरेदीबाबत फसवणूक होऊ नये म्हणून पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
फोटो सौजन्य- ANI

Thane:  सध्या बदलत्या काळामुळे डिजिटल पद्धतीने सर्वत्र व्यवहार केले जातात. हे व्यवहार अवघ्या काही वेळातच पूर्ण होत असल्याने नागरिक याचा सर्वाधिक वापर करतात. परंतु ऑनलाईन पद्धतीने काही वेळेस व्यवहार करणे आपल्या अंगाशी येते. कारण गेल्या काही काळापासून नागरिकांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होत असल्याचे प्रकार दिवसागणिक समोर येत आहेत. अशातच आता ठाणे पोलिसांकडून नागरिकांची ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना फसवणूक होऊ नये म्हणून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

ठाणे पोलिसांनी ऑनलाईन खरेदी वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल स्पष्ट केले आहे. त्यानुसार, कॅश ऑन डिलिव्हरी, अधिकृत अॅप, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड संबंधित माहितीची गुप्तता, डिलिव्हरी करण्यात आलेल्या प्रोडक्ट्सची तपासणी किंवा ऑफरच्या नावाखाली तुमची लूट केली जातेय का या बद्दल अधिक स्पष्ट केले आहे.(Baby Selling Racket In Mumbai: नवजात बालकांची तस्करी करणार्‍या टोळीला क्राईम ब्रांच युनिट कडून अटक; एका डॉक्टरचाही समावेश)

Tweet:

दरम्यान, पोलिसांसह बँकेकडून सुद्धा नागरिकांनी तुमची खासगी माहिती कोणालाच शेअर करु नका असे आवाहन केले जाते. तसेच ऑनलाईन पद्धतीने एखादा व्यवहार करताना तो कितपत सुरक्षित आहे याचा सुद्धा विचार करा. कारण फसवणूक करणाऱ्या व्यक्ती लोकांना सूट, ऑफरच्या नावाखाली बँकेची माहिती घेत तुमच्या खात्यातील रक्कम खाली करु शकतात. त्यामुळे नेहमीच आपली फसवणूक होणार नाही याची खात्री करुनच ऑनलाईन पद्धतीने व्यवहार किंवा खरेदी करावी असे ही ठाणे पोलिसांनी म्हटले आहे.