Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

मुंबई मध्ये क्राईम ब्रांच युनिट 1 कडून नवजात बालकांची तस्करी करणार्‍या एका टोळीला ताब्यात घेतले आहे. यामध्ये 7 महिला आणि 2 पुरूषांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटकेत असलेल्यांमध्ये एका डॉक्टाराचा देखील समावेश आहे. सध्या त्यांना 21 जानेवारीपर्यंत कस्टडी ठोठावण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, या टोळीने मागील सहा महिन्यात 4 बालकांचा व्यवहार केला आहे. पण हा आकडा अधिक असण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. सध्या पोलिस तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. दरम्यान हा नवजात बालकांचा व्यवहार 60 हजार ते 3 लाख रूपये अशा स्वरूपात केला जात होता.

ANI Tweet

पोलिसांनी कॉल रेकॉर्ड ट्रेस केले आहेत. 8 मोबाईल फोन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये नवजात बालकांचे फोटो आहेत. काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या बालकांचे पालक मुंबई, पुण्यात आहेत. मुंबई पोलिसांनी केला बाळ चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक.

वांद्रे येथील ज्ञानेश्वर नगर मध्ये एक महिला मुलांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना टीपद्वारा मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांनी जाळं रचून या टोळीला ताब्यात घेतलं आहे.