ठाणे: पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे नागरिकांना आवाहन
Sanjeev Jaiswal | Thane Commissioner | Archived, edited, representative images

आज देशभरात होळीच्या सणाचा उत्साह आहे. होळी म्हटलं की रंग खेळलं आलंच. मात्र रासायनिक रंगामुळे होणारे दुष्परिणाम, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठाणे पालिका आयुक्त (Thane Municipal Commissioner) संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी खास पाऊल उचलले आहे. (होळी, रंगपंचमी साठी नैसर्गिक रंग घरच्या घरी कसे बनवाल?)

होळीच्या सणाला वृक्षतोड होऊ नये, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पर्यावरणपूरक होळी खेळण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना केले आहे. तसंच होळीचा सण साजरा करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पाण्याचे टँकर देण्यात येऊ नये, असे आदेश त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील सर्व्हिस स्टेशनलाही तसे आदेश देण्याचा सूचना पाणी पुरवठा विभागातील अधिकऱ्यांना देण्यात आले आहेत. (होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!)

पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन नागरिकांनी वृक्षतोड टाळावी, रंगाच्या फुग्यांनी होणारी इजा टाळावी, पाण्याचा अपव्यय टाळावा, म्हणून नागरिकांना नैसर्गिक रंगांचा वापर करुन पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.