ठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान रुळाला तडे, मध्य रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत
Mumbai local | (Photo credit: archived, edited, symbolic images)

ठाणे-मुलुंड रेल्वे (Thane-Mulund Railway Station) मार्गादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वे वाहतूक (Central Railway Mumbai) पुरती कोलमडल्याचे वृत्त आहे. सायंकाळी साडेसहा वाजनेच्या सुमारास हा प्रकार घडला. रुळाला तडे गेल्याने त्याचा गंभीर परिणाम वाहतुकीवर झाला. सुरुवातीला या मार्गावरुन धावणाऱ्या लोकल रेल्वे उशीरा धावायला लागल्या आणि आता वाहतुक व्यवस्थाच कोलमडल्याचे पुढे आले आहे.

प्राप्त माहितीवरुन, जलदगती मार्गावरील रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे जलदगती मार्गावरील वाहतूक सध्या स्लो ट्रॅकवर वळविण्यात आली आहे. (संदर्भासाठी हे पाहा, मुंबई: सायन-माटुंगा दरम्यान झाडाला आग लागल्याने मध्य रेल्वे वाहतू सेवा विस्कळीत)

संध्याकाळची वेळ म्हणजे मुंबईकरांचा ऑफीस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ. नेमकी याच वेळी वाहतूकसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे तो वेगळाच.