ठाणे: मेडिकलच्या दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या भामट्याकडून गोळीबार, एका तरुणाचा मृत्यू
(प्रतिनिधिक छायाचित्र ) Photo credits Pixabay

ठाणे येथे मेडिकलच्या दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या भामट्याने एका 26 वर्षीय तरुणावर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणाचा मृत्यू झाला असून चोरट्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तसेच परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

कळवा पूर्वेला असलेल्या एका मेडिकलच्या दुकानाताचे टाळे तोडून एक अज्ञात व्यक्तीने आतमध्ये शिरकाव केला. दुकानात एक तरुण तेथेच झोपला होा. तरुणाला काही आवाज आला म्हणून उठल्यानंतर समोर असलेल्या भामट्याने त्याच्यावर गोळीबार केला असता तेथेच त्याचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आरोपीचा तपास करण्यात येत आहे.(घाटकोपर: जागृतीनगर मेट्रो स्टेशनजवळ दिवसाढवळ्या सुरा खुपसून एका व्यक्तीचा खून)

 तर गेल्या दोन महिन्यांपूर्वी दादर फूल मार्केट येथे सकाळीच्या वेळेस एका इसमावर दिवसाढवळ्या गोळ्या घालून त्याची हत्या झाल्याची घटना घडली होती. मृत व्यक्तीचं नाव मनोज मौर्य असे होते. हल्लेखोर फरार बाईकवरून आले होते. त्यांनी दादर फूल मार्केटच्या फ्लायओव्हर भागात गोळीबार केला होता.  त्याचसोबत मुंबई घाटकोपर मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी रिक्षातून येत एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्याचा प्रकार दुपारी घडला आहे. परंतु या घटनेमागील कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचसोबत मृत व्यक्तीची सुद्धा ओळख पटली नसल्याचे सांगण्यात येत आहे.