Thane: कोरोनाचे नियम पायदळी तुडवत ठाण्यात साजरा केला बैलाचा वाढदिवस; विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Thane: Man celebrates bull's birthday without following Covid-19 norms (Photo Credit: TOI)

कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता ठाण्यात (Thane) पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना डोंबिवली (Dombivli) परिसरात कोरोनाचे नियम पायदळी तुडवत एका बैलाचा जंगी वाढदिवस करण्यात आला आहे. या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र कोविड कलम, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंध अधिनियमांतर्गत संबंधित बैलाच्या मालकावर विष्णूनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण म्हात्रे (वय, 32) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. किरण हा रेतीबंदर रोड परिसरातील रहिवाशी आहे. शहरात कोरोनाचे संकट वावरत असताना किरणने बुधवारी रात्री आपल्या मित्रांसह त्याच्या बैलाचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यानंतर या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत किरण त्याच्या मित्रांसह बैलाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. मात्र, बैलाचा वाढदिवस साजरा करत असताना कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हते. तसेच कोणीही सोशल डिस्टन्सिंग न ठेवल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ विष्णूनगर पोलिसांच्या निर्दशनास आला. त्यानंतर किरण म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा-Coronavirus in Mumbai: कोरोनाचा धोका पुन्हा वाढला! मुंबईत आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; पाहा संपूर्ण आकडेवारी

टाईम्स ऑफ इंडियाचे ट्वीट-

कल्याण डोंबिवलीत दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे वाढत चालले असले तरी दुसरीकडे लोकांमधील निष्काळजी आणि बेजबाबदारपणा काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. सध्या कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागात कोरोनाचे जाळे वेगाने पसरत आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी घेणे तसेच जबाबदारीने वाढण्याची गरज आहे.