Goodwin Jewellers Scam (Photo Credits: ANI)

देशभरात पीएमसी बँक (PMC Bank) घोटाळा आणि त्यामुळे हजारो ग्राहकांचे नुकसान झाल्याच्या चर्चा ताज्या असतानाच आता गुडविन ज्वेलर्सच्या (Goodwin Jewellers) बाबतीत एका संभाव्य घोटाळा समोर येत आहे. ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), डोंबिवली (Dombivali), उल्हासनगर (Ulhasnagar) आणि अंबरनाथ (Ambernath) या भागातील गुडविन ज्वेलर्सच्या सर्व शाखाची दुकाने मागील आठवड्यापासून बंद होती, साहजिकच ऐन दिवाळीच्या वेळी एका सोने व्यापारी संस्थेची दुकाने बंद असल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती यातूनच आज ठाण्यातील गुडविन ज्वेलर्स शोरूम बाहेर ग्राहकांनी आंदोलन करत आपले पैसे परत करण्याची मागणी केली. पोलिसांच्या माहितीनुसार यातीलच 250 ते 300 जणांनी दुकाने बंद दिसण्यावरून पोलिसांकडे मदत मागितली होती ज्यानंतर पोलिसांकडून गुडविन ज्वेलर्सच्या शाखा सीलबंदन करण्यात आल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, ठाणे व अन्य काही ठिकाणी गुडविन ज्वेलर्सच्या शाखा आहेत, ज्यातून बिशी आणि फिक्स डिपॉझिट सारख्या अनेक आकर्षक योजना ग्राहकांना दिल्या जात होत्या. साहजिकच यामुळे संस्थेत हजारो लोकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. दिवाळीच्या आधी 21 ऑक्टोबर रोजी दुकानाच्या बाहेर पुढील दोन दिवस दुकान बंद राहील असा बोर्ड लावला होता मात्र यानंतरही पूर्ण आठवडाभर या जेव्हीलर्सच्या सर्व शाखांची दुकाने बंद होती. अशातच गुडविन ज्वेलर्सच्या मालकांचा तपास करताच डोंबिवली येथील पलावा सिटीत राहत्या घरून सुद्धा कुटुंबासह पळून गेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यानंतर तर ग्राहकांची चिंता आणखीन च वाढून परिणामी आज हे आंदोलन करण्यात आले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, गुडविन ज्वेलर्स प्रकरणात डोंबिवलीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी सापडलेले नाहीत. तर शनिवारी 29 ग्राहकांनी 1  कोटी 80 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार केली होती. रविवारी आणखी 25 ग्राहकांनी तक्रारी केल्या. या तक्रारींनुसार फसवणुकीचा आकडा 1  कोटी 13 लाख असून एकूण फसवणुकीचा आकडा 2  कोटी 93 लाखावर गेला आहे.