
Thane Fire: ठाण्यात घोडबंदर रोडवर असलेल्या एका बंगल्याचा भीषण आग लागल्याची घटना उघडकीस येत आहे. माधवी निवास असं बंगल्याचं नाव आहे. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास बंगल्याला आग लागल्याची माहिती मिळाली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही आग कशी लागली याचा शोध घेतला जात आहे. या बंगल्यात एकुण पाच जण राहत होती अशी माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर असलेलं वाघ बीळ नाका परिसरात माधवी निवास असं नाव असलेल्या बंगल्याला भीषण आग लागली, बंगल्याला पहिल्या मजल्यावर आग लागली आणि या आगीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. काही तासांत आग आटोक्यात आली. जखमी लोकांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पहाटे ही आग कशी लागली याचा शोध घेण्यात येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. आगीची माहिती परिसरात पसरात एक खळबळ उडाली आहे.