Thane Water Cut Schedule: ठाणे शहरात सलग चार दिवस पाणीकपात, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Water Cut | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Water Cut In Thane: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात त्या ठाण्यामध्ये पुढचे काही दिवस पाणी कपात (Water Cut in Thane) असणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनो पाणी जपून वापरा. ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) हद्दीत येणाऱ्या अनेक ठिकाणी जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस म्हणजेच 21 ते 24 फेब्रुवारी याकाळात ठाणे शहरांतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणी पाणीपुरवठा बंद (Water Cut news) असणार आहे. ठाणे शहर पाणीकपात वेळापत्रक (Thane Water Cut Schedule) घ्या जाणून. ज्यामुळे आपली गैरसोय टळेल आणि तुम्हाला पाण्याच्या आवश्यक साठाही करता येईल.

ठाण्यात कोणत्या परिसरात कोणत्या तारखेला किती वेळ पाणीकपात?

मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023

सकाळी 9.00 ते रात्री 9.00 (एकूण- 12 तास)

ठिकाण- घोडबंदर रोड, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा

रात्री 9.00 ते सकाळी 9.00 (एकूण- 12 तास)

गांधीनगर, सुरकर पाडा, उन्नती, सिद्धांचल, जेल, साकेत, ऋतू पार्क, रुस्तमजी, कळवा, खारेगाव, आतकोणेश्वर नगर, रघुकूल आणि मुंब्रा येथील काही भाग (हेही वाचा, अशा पद्धतीने पाणी प्यायल्यास आरोग्यावर होऊ शकतात विपरित परिणाम)

बुधवार, 22 फेब्रुवारी 2023

सकाळी 9.00 ते रात्री 9.00 (एकूण- 12 तास)

सिद्धेश्वर, समतानगर,दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी

रात्री 9.00 ते सकाळी 9.00 (एकूण- 12 तास)

गांधीनगर, सुरकर पाडा, उन्नती,सिद्धांचल, जेल,साकेत, ऋतू पार्क, रुस्तमजी,कळवा, खारेगाव, आटकुणेश्वर नगर, रघुकूल, मुंब्रा

गुरुवार, 23 फेब्रुवारी 2023

सकाळी 9.00 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9.00 (एकूण- 24 तास)

इंदिरानगर, लोकमान्य नगर, किसननगर, श्रीनगर, शांतीनगर, रामनगर,रुपादेवीपाडा, सावरकर नगर, डवलेनगर, आंबेवाडी,परेरा नगर, झांजेनगर, साठे नगर,कैलासनगर, भटवाडी

सकाळी 9.00 ते रात्री 9.00 (एकूण- 12 तास)

सिद्धेश्वर, समतानगर,दोस्ती ,आकृती, जॉन्सन, इटर्निटी

सकाळी 9.00 ते रात्री 9.00 (एकूण- 12 तास)

घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली,ओवळा भाईंदरपाडा

शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023

सकाळी 9.00 ते रात्री 9.00 (एकूण - 12 तास)

सिद्धेश्वर, समतानगर,दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी

रात्री 9.00 ते सकाळी 9.00 (एकूण- 12 तास)

घोडबंदर रोड,माजिवडा, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पाटलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली,ओवळा, भाईंदरपाडा

पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा. जेणेकरुन पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे अवाहन प्रशासनाने केले आहे.