ठाणे पोलिसांनी (Thane Police) एका 72 वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे. सदर व्यक्ती हा माहिती अधिकार कार्यकर्ता (RTI Activist) आहे. मुकेश बेचरदास कनकिया असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर बांधकाम व्यावसायिकास खंडणी मागितल्याचा आरोप आहे. ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे त्याने 3 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे पोलिसांनी माहिती देताना म्हटले आहे.
बांधकाम व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीवरुन खंडणी विरोधी पथकाने (Anti-Extortion Cell-AEC) कारवाई केली. प्राप्त तक्रारीवरुन खंडणी विरोधी पथकाने सापळा रचला या वेळी मुकेश बेचरदास कनकिया याला 3.11 लाख रुपयांची लाच खेताना रंगेहात पकडण्यात आले. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. (हेही वाचा, Thane: शहापूरातील एनसीसी कॅम्पमध्ये गोळी लागल्याने 13 वर्षीय मुलगी जखमी)
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार कांतीलाल बौवा यांना एका गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम मिळाले होते. या कामाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगणाऱ्या मुकेश बेचरदास कनकिया याने नगरविसाक खात्याकडून संबंधित सोसायटीबद्दल आगोदरच माहिती मागवली होती. त्याने हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगत तक्रारीचे अर्ज केले होते.
दरम्यान, कंत्राटदाराकडून संबंधीत व्यक्तीला तक्रार मागे घेण्याची विनंती करण्यात आली. या माहिती अधिकार कार्यकर्ता असे सांगणाऱ्या व्यक्तीने पाच लाख रुपयांची मागणी केली. कंत्राटदाराने 3.6 लाख रुपयांची मागणी करत तडजोड करण्याचा प्रयत्न केला. परंतू, आरोपीच्या अपेक्षा वाढल्या. त्याने 10 लाख रुपयांची मागणी केली. शेवटी तक्रारदाराने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली.