पायतान (Paytaan) म्हणजेच चपला ठेवण्यांवरुन झालेल्या भांडणाचे पर्यावसन एका नागरिकाच्या मृत्यूमध्ये झाले आहे. ठाणे (Thane) शहरातील मीरारोड (Mira Road, Thane) परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये ही घटना घडली. मीरारोड परिसरात असलेल्या अस्मिता डॅफोडिल्स कॉम्प्लेक्स या इमारतीत बी विंगमध्ये चौथ्या रुपानी आणि अधिकारी खत्री कुटुंबीय शेजारी शेारी राहतात. या कुटुंबामध्ये पूर्वीपासूनच काही वाद होता. दरम्यान, यातील खत्री कुटुंबीयांनी चपलांची रॅक दरवाजासमोरील रिकाम्या आणि सामाईक पॅसेजमध्ये ठेवली होती. याला शेजारी असलेल्या समीर रुपानी आणि झैनाब रुपानी या पतीपत्नींचा विरोध होता. यातून दोन्ही कुटुंबामध्ये मोठे भांडण झाले.
दरवाजासमोरील व्हरांड्यामध्ये चपलांचे कपाट का ठेवले असा जाब समीर रुपानी आणि झैनाब रुपानी यांनी अधिकारी खत्री कुटुंबीयांना विचारला. यावरुन दोन्ही शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. समीर रुपानी आणि झैनाब रुपानी या पतीपत्नीने अधिकारी खत्री यांना बेदम मारहाण सुरु केली. ज्यात मारहाण सहन न झाल्याने 54 वर्षीय अधिकारी खत्री यांचा जागीच मृत्यू झाला. खत्री यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच समीर रुपानी याने घटनास्थळावरुन पलायन केले. तो फरार झाला. मात्र, पोलिसांनी झैनाब रुपानी हिला अटक केली. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, तिला 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा, Thane Shocker: शेजाऱ्याने अल्पवयीन भावंडांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले; मुलाचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी)
प्राप्त माहिती अशी की, शनिवारी (4 मार्च 2023) रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. व्हरांड्यामध्ये चपलांचे कपाट ठेवण्यावरुन रुपानी दाम्पत्याने जाब विचारल्यावर अधिकारी खत्री यांच्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर आले. ज्यामुळे दोन्ही शेजाऱ्यांमध्ये विकोपाचे भांडण झाले.दरम्यान, चिडलेल्या झैनाब याने अधिकारी खत्री यांना एकापाठोपाठ एक असे बुक्के मारले. तर दुसऱ्याने खत्री यांना पकडून ठेवले. यात घाव वर्मी लागल्याने आणि एकाच वेळी दोघांनी आळीपाळीने बुक्के मारल्याने अधिकारी वर्मी यांना मारहाण सहन झाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
अधिकारी खत्री यांना झालेली मारहाण इतकी प्रचंड होती की, त्यांच्या तोंडाला गंभीर जखम झाली. चेहरा रक्ताळला तसेच त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. ते पाहून कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतू, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच खत्री यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.