Thane: अंगातील काकाचे भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर स्वयंघोषित बाबाचा बलात्कार
Representational Image (Photo Credits: Pixabay)

ठाणे येथील भिवंडीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वयंघोषित बाबाने एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची ही घटना आहे. या बाबाने मुलीच्या अंगात असलेल्या काकाचे भूत काढण्याच्या बहाण्याने तिच्यावर हे अत्याचार केले आहेत. या प्रकरणी मुलीची आई आणि स्वयंघोषित बाबा याला अटक केली आहे. याबद्दल पीटीआयने अधिक माहिती दिली आहे.(Sex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उघड; 5 महिलांची सुटका)

पीडित मुलीने पोलिसांना असे सांगितले की, तिच्या मानेला दुखत होते आणि त्यावेळीच स्वयंघोषित बाबाने तिच्यामध्ये मृत काकाचे भूत असल्याचे सांगितले. शरिरातील हे भूत बाहेर काढण्यासाठी मी मदत करेन असे त्या बाबाने सांगितले.(Navi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना)

मुलीच्या अंगातील भूत काढण्यासाठी बाबा आपल्यासह तिला जंगलात घेऊन गेला. तेथेच तिच्यावर त्याने बलात्कार केला. मुलीला जंगलात घेऊन जाताना तिची आई आणि तिच्या ओळखीचा तरुण सुद्धा होते. या प्रकरणी विविध कायद्याअंतर्गत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.