शिवसेना नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणेकरांसाठी अनोख्या पद्धतीची बस शेल्टरची उभारणी
Bus Shelter (Photo Credits-Twitter)

राज्यात शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर विविध उपक्रम राबवले जात आहेत. तर नुकत्याच ठाणे येथील नागरिकांसाठी एका अनोख्या पद्धतीचा बस थांबा उभारण्यात आला आहे. या बस शेल्टरची प्रकृती हुबेहुब शाळेच्या बस सारखी प्रतिकृती आहे. याबाबत शिवसेनेचे नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी ट्वीट करत त्याचे फोटो झळकवले आहेत. त्याचसोबत नेहमीच ठाणे शहर सुंदर बनवण्याचा प्रयत्न होत असल्याने ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापालिकेचे आभार मानले आहेत.

तर पुर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या बस शेल्टरचा लोकार्पणाचा सोहळा शनिवारी पार पडला. ठाण्यात हे बस शेल्टर वर्तक नगर येथील बालाजी मंदिर आणि डावले नगर बस डेपो जवळ उभारण्यात आले आहे.(राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे बधिरीकरण तज्ज्ञ पदाची भरती)

Tweet:

तर काही दिवसांपूर्वीच ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे दररोज रेल्वेतून पडून अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तसेच वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने या रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन स्टेशन तयार करण्यात येणार आहे. या स्टेशनचे नाव 'कोपरी' असणार आहे. या स्टेशनला ठाणे महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. हे स्टेशन उभारण्यासाठी सरकार 14 एकर जागा देणार आहे. या स्टेशनच्या उभारणीसाठी 120 कोटी रुपये खर्च येणार आहे