राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे बधिरीकरण तज्ज्ञ पदाची भरती
Chhatrapati Shivaji Maharaj Hospital Kalwa | (Photo Credit: File Photo)

बधिरीकरण तज्ज्ञ (Anesthesiology) म्हणून काम करु अथवा पाहू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे (Rajiv Gandhi Medical College Thane), छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital Kalwa) येथे रिक्त असलेल्या बधिरीकरण तज्ज्ञ पॅनेल अॅनेस्थेटिस्ट (Anesthetist) पदाच्या 3 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2019 या दिवशी सकाळी 11 वाजता योग्य व आवश्यक कागदपत्रांसह समक्ष उपस्थित राहावे, असे अवाहन जाहिरातीच्या माध्यमातून दोन्ही संस्थांच्या अधिष्ठातांनी केले आहे. बधिरीकरण तज्ज्ञ पद पात्रता, अटी, कागदपत्रं आणि जाहिरातीचा तपशील खालीलप्रमाणे.

  • बधिरीकरण तज्ज्ञ पॅनेल कालावधी दिन. 1 जानेवारी 20015 ते 30 नोव्हेंबर 2020 असा असेल.

    बधिरीकरण तज्ज्ञांची नेमणूक Walk-in-interview द्वारे करण्यात येईल.

नियम व अटी

पॅनेल अॅनेस्थेटिस्ट पदासाठी आवश्यक कागदपत्रे

1) उमेदवाराने www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरील अर्ज डाऊनलोड करुन भरावा.

2) Maharashtra Medical Council येथे आपली नोंदणी आहे हे दर्शवणारी आवश्यक कागदपत्रे.

3) Maharashtra Medical Council येथे नोंदणीकृत असणारी आपली शैक्षणिक आर्हता.

वरील दोन व तीन साठी www.Maharashatra MedicalCouncil.in या वेबसाईटवरुन डाऊनलोड केलेले स्वत:ची स्वाक्षरी असलेली कागदपत्रे सादर करावीत.

4) अर्जावर स्वत:चे छायाचित्र चिकटवावेल.

मुलाखतीचे ठिकाण, स्थळ, वेळ

मा. अधिष्ठाता, रागांवैम व छाशिमरु, यांचे कार्यालय कळवा येथे गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2019 सकाळी 11 वाजता. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी आपली मूळ (Oriental) कागदपत्रे सादर करावी. तसेच, स्वसाक्षांकित केलेला एक गठ्ठा (सेट) आपल्या सोबत ठेवावा. महत्त्वाचे म्हणजे ठाण्यात निवासी असणाऱ्या डॉक्टरांना प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठई बधिरीकरण तज्ज्ञ पद जाहिरात पीडीएफ रुपात.

(टीप: वरील मजकूर हा प्रसिद्ध झालेली जाहिरात तसेच, www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर दर्शविण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरुन आहे.)