Nanded Tempo Accident: नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे भर बाजारात टेम्पो घुसला, 2 ठार, 16 जखमी
Nanded Tempo Accident | PC: Twitter)

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कंधार (Kandhar ) इथल्या बाजारात सोमवारी रात्री (17 ऑगस्ट) उशीरा एक धक्कादायक अपघात घडला. या अपघातात एक दाम्पत्य जागीच ठार झाले. तर, इतर 16 जण गंभीर जखमी झाले. आठवडी बाजारा टेम्पो ( Nanded Tempo Accident) भरधाव वेगाने घुसल्याने ही घटना घडली. अपघातानंतर पुढे आलेली दृष्ट अनेकांचे लक्ष विचलित करणारी आहेत. कंधार येथील महाराणा चौकात (Maharana Pratap Chowk - Kandhar) आलेल्या अवजड टेम्पोचे ब्रेक अचाकन फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. हा टेम्पो चौकातील एका टिन पत्र्याच्या दुकानात घुसला आण उलटला.

डेम्पोची धडक बसल्याने गोविंद भंगारे (वय 65 वर्ष) आणि मथुरा भंगारे (वय 55 वर्ष) हे पती-पत्नी दाम्पत्य जागीच ठार झाले. तर, इतर 16 जण जखमी झाले. शिवाय टेम्पोची धडक बसल्याने इथल्या चार दुकानांचेही मोठे नुकसान झाले. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ आणि काही छायाचित्रे अनेकांच्या व्हॉट्समधून व्हायरल झाली आहेत. (हेही वाचा, नांदेड: 25 लाखांची रोकड आणि 74 तोळ्यांचे दागिने घेऊन 19 वर्षीय मुलीचे प्रियकरासोबत पलायन)

कंधारमध्ये प्रत्येक सोमवारी आठवडी बाजार असतो. हा बाजार महाराणा प्रताप चौकात भरतो. कंधार आणि परिसरातील नागरिक या बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. सहाजिकच या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. अशा गर्दीच्या ठिकाणी हा अपघात घडला आहे. जखमींवर कंधार येथीलच उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, गंभीर जखमी असलेल्या चौघांना पुढील उपचारासाठी नांदेडला हालविण्यात आले आहे.

कंधार येथे घडलेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघात नेमका कसा झाला, त्यात चालकाचा दोष होता का? हा घातपाताचा प्रयत्न होता का? यांसारख्या विविध चर्चा आणि तर्कवितर्कांना परिसरात उत आला आहे. नागरिक या अपघाताची रसभरीत वर्णनं एकमेकांना ऐकवत आहेत. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरु केला आहे.