विदर्भात तापमानाचा पारा 43 अंशापेक्षा वाढला, राज्यात उष्णतेची लाट कायम
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

राज्यात काही ठिकाणी कोरड्या वातावरणामुळे तापमान कायम असूनही उन्हाच्या झळा लोकांना सहन कराव्या लागत आहेत. तर मराठवाडा आणि विदर्भात तापमान 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले आहे. मात्र मुंबई, कोकण या ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत कमी आहे.

हवामान कोरडे असल्याने तापमानाचा पारा कायम राहणार असून विदर्भासह अन्य ठिकाणी उष्णतेची लाट अधिकच वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत चाललेला दिसून येत आहे.त्याचसोबत राज्यातील बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्यावर गेला आहे.(हेही वाचा-मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट, मुंबईत तापमान घटले)

तर पुणे, जळगाव, सातारा, सोलापूर या ठिकाणी 40 ते 42 अंशानी तापमान वाढले आहे. विदर्भात नागपूर, अमरावत, वर्धा, चंद्रपूर येथे तापमानाचा पारा 43 अंशावर गेल्याने तेथील ऐन दुपारच्या वेळेस लोकांच्या अंगाची लाहीलाही होत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु पुढील काही दिवस तापमान कोरडे जरी राहणार असले तरीही विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.