प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

सध्या उष्णाळा सुरु होत असल्याने उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. तर शनिवारी (30 मार्च) मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेचे तापमान वाढणार आहे. तर मुंबईतील (Mumbai) तापमानात घट झाल्याचे भारतीय हवामान शास्राने सांगितले आहे. त्याचसोबत मध्य महाराष्ट्रात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली गेली असली तरीही काही ठिकाणी आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी अकोल्याच (Akola) तापमान सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस झाला होता. तर मुंबईत तापमानात घट दिसून आली तरीही मुंबईकरांना उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. हवामान शास्रानुसार गोव्यातसह संपूर्ण राज्यात गेल्या 24 तासात हवामान कोरडे होते. तसेच मुंबईत 33.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

तर येत्या दोन दिवसात मुंबईत तापमान 34-24 अंशाच्या आसपास राहणार आहे. त्याचसोबत विदर्भात आज आणि उद्या तुरळक पावसाची शक्यता असून गोव्यात 1-2 एप्रिल रोजी हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला गेला आहे.