
नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये 16 वर्षीय मुलाचा ओव्हरहेड वायरचा झटका बसून झालेल्या गंभीर दुखापतीच्या उपचारामध्ये मृत्यू झाला आहे. आरव श्रीवास्तव असं या मुलाचं नाव आहे. आठ दिवसांपूर्वी त्याला दुखापत झाली झाली होती. ऐरोली मध्ये त्याच्यावर नॅशनल बर्न्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. उपचरादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. National Burns Hospitalचे Dr Sunil Keswani यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरवला गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. थर्ड डिग्री बर्न्स मध्ये तो semi comatose अवस्थेत आणि व्हेंटिलेटर वर होता.
बेलापूरचा रहिवासी आरव हा सीवूड्स येथील डीपीएस स्कूलमध्ये अकरावीच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. गेल्या रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर देखभालीचे काम सुरू असताना मेगाब्लॉक दरम्यान ही घटना घडली. नेरुळ आणि जुईनगर स्थानकांदरम्यान कचरा वाहतूक करणारी ट्रेन उभी होती. आरव त्याच्या इतर मित्रांसह घटनास्थळी गेला होता आणि तो ट्रेनमध्ये चढला. "जरी आधी असे म्हटले जात होते की मुले रील बनवत होते, परंतु तपासात आम्हाला आढळले की तो मुलगा वरून ट्रेन कशी दिसते हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी चढला होता," असे वाशी जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंद्रे यांनी सांगितले आहे.
आरव यामध्ये गंभीररित्या भाजला होता आणि ट्रेनवरून पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आरवला सुरुवातीला नेरुळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर विशेष उपचारांसाठी ऐरोली येथील बर्न्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. पाच दिवस अतिदक्षता विभागात राहूनही शनिवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती उंद्रे यांनी दिली.