Tear Gas Fired At Farmers Protest: शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या; पंजाब-हरियाणा सीमेवरी घटना
Tear Gas Fired At Farmers Protest | (Photo Credits: ANI)

Farmers Protest 2024: 'चलो दिल्ली' (Delhi Chalo Farmers Protest) म्हणत आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकरी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा (Tear Gas Fired At Farmers Protest) करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंजाब आणि हरियाणा दरम्यानच्या शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमले होते. या वेळी हा प्रकार घडल्याचे समजते. दुपारी बाराच्या सुमारास शेतकऱ्यांचा मोठा जमाव दिल्लीच्या दिशेने निघाला. या वेली पोलिसांनी अश्रुधुराचे दोन राऊंड फायर केल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून अश्रुधुराचे नळकांडे डागल्याचे या वृत्तात म्हटले आहे. केंद्र सरकारसोबतच्या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आंदोलकांच्या मागण्या यावर कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. ते मोठ्या तयारीने दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत.

देशभरातील सुमारे 200 शेतकरी संघटना आज दिल्लीच्या दिशेने

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या प्रमुख राज्यांसह देशभरातील सुमारे 200 शेतकरी संघटना आज दिल्लीच्या दिशेने निघाल्या आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मुलत: 2020/21 च्या आंदोलनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. (हेही वाचा, Farmers’ March: शेतकरी आंदोलनाची हाक, राजधानीकडे कूच; दिल्ली-यूपी सीमेवर कलम 144 लागू, शंभू सीमा सील)

सहा महिने पुरेल इतके रेशन घेऊन दिल्लीकडे कूच

केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची एक बैठक पार पडली. मात्र, त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शेकडो शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. हे शेतकरी आंदोलन  यशस्वी व्हावे यासाठी शेतकरी सहा महिने पुरेल इतके रेशन आणि डिझेल घेऊन निघाले आहेत. गुरुदासपूर येथील शेतकरी हरभजन एचसिंग सांगतो, आमच्याकडे सुईपासून हातोड्यापर्यंत सर्व गोष्टी आहेत. आम्ही सहा महिने पुरेल इतका अन्नसाठा घेऊन आमचे गाव सोडले आहे. आमच्याकडे पुरेसे डिझेल आहे. हरियाणातील आमच्या भावांसाठीही आम्ही अन्न घेतले आहे. (हेही वाचा, 'Delhi Chalo' Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर ठाम, दिल्ली हाय अलर्टवर; वाहतुकीवर निर्बंध, सीमा बंद; जाणून घ्या 10 मुद्दे)

व्हिडिओ

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारनेही सुरक्षा वाढविण्यावर भर दिला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी रस्त्यांवर काँक्रीट ब्लॉक आणि लोखंडी खिळे मारुन रस्ते बंत करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये प्रवेश करता येऊ नये यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. दिल्लीच्या सीमा बंद करण्यात आल्याआहेत. शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दाखल होत असल्याने पोलिसांनी रस्त्यांवर बॅरीकेट्स, काँक्रीटीकरण आणि खिळे मारुन सीमा बंद केल्या आहेत. दिल्ली वहतूक पोलिसांनी सीमावर्ती भागांभोवती व्यावसायिक आणि खाजगी वाहनांसाठी वाहतूकीत बदल केला आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि शक्यतो आंदोलनाच्या मार्गावर वाहने घेऊन न जाण्याचे अवाहन केले आहे.