मुंबईतील कडाक्याच्या थंडीत पहाटे सुरु झालेल्या टाटा मॅरेथॉनला (Mumbai Tata Marathon ) सरतेशेवटी आता गालबोट लागले आहे. या शर्यतीत एका 64 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. गजानन माळजलकर (Gajanan Maljalkar) असे वृद्ध व्यक्तीचे नाव असून कार्डियाक अरेस्ट (Cardiac Arrest) मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. माळजकर यांना अटॅक येताच त्या ठिकाणी उपस्थित प्रतिनिधींनी त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटल (Bombay Hospital) मध्ये दाखल केले मात्र तिथे पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वास्तविक ,मागील काही दिवसांपासून मुंबईचे वारंवार खाली येणारे तापमान पाहता शर्यतीत सहभागी धावपटूंसाठी प्राथमिक उपचार उपलब्ध करण्यात आले होते, मात्र तरीही माळजकर यांच्यावर काळाचा घाला होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.आजच्या दिवसाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा
याशिवाय, या शर्यतीत धावताना एकूण 7 जणांना हृदय विकाराचा झटका आल्याचे समजत आहे, संबंधित व्यक्तींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत मात्र माळजकर यांना मात्र वाचवता न आल्याने शर्यतीला गालबोट लागल्याचे म्हंटले जात आहे.
ANI ट्विट
Bombay Hospital PRO, #Mumbai: 64-year-old Gajanan Maljalkar died of cardiac arrest while running the Tata Mumbai Marathon today morning. He was declared brought dead. Total 7 people suffered heart attack during the run today. All 7 people are under treatment at the hospital.
— ANI (@ANI) January 19, 2020
आज पहाटे मुंबई मॅरेथॉनच्या 17व्या वर्षातील शर्यतीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरुवात झाली होती. सोबतच वरळी येथून 'हाफ मॅरेथॉन'ला सुरुवात झाली होती. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय धावपटूंसहित 55 हजार जणांनी सहभाग घेतला होता, यात ज्येष्ठ नागरिकांच्या शर्यतीमध्ये 1 हजार 22 आणि अपंगांच्या स्पर्धेत 1 हजार 596 धावपटू सहभागी झाले होते.